| पनवेल | वार्ताहर |
कामोठे येथे वृद्ध व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या टोळीने हैदोस मांडला आहे. नुकतेच हातचलाखी करून चोरट्यांनी 83 वर्षीय वृद्धेचे 75 हजार रुपयांचे दागिने लांबवले आहेत. ही घटना गणेश मंदिराजवळ घडली आहे. दोन व्यक्तींनी या रस्त्यावरून जाणाऱ्या साईनाथ हेरीटेज इमारतीत राहणाऱ्या 83 वर्षीय वृद्धेला थांबवून आजचा पेपर वाचलात का? त्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची बातमी असल्याचे सांगितले. आणि बोलण्यात गुंतवून ठेवत हातचलाखी करून त्या वृद्धेच्या अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या लुबाडून चोरटे पसार झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






