मुरूडमध्ये जोरदार लॉजिंग बुकिंग सुरू
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
10 वी 12वीच्या परीक्षा संपून या आठवड्यात सलग सुट्ट्यादेखील आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील पर्यटक रायगडच्या समुद्रकिनारील पर्यटन ठिकाणांकडे वळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.1 मे, नंतर उन्हाळी सुट्टी सुरू होणार असल्याने आणि कोरोना मुक्त वातावरणामुळे कुटुंबासमवेत मोठ्या संख्येने पर्यटक या सीझन मध्ये फिरण्यासाठी समुद्रकिनारी येतील अशी दाट शक्यता अनुभवी मंडळीनी बोलताना व्यक्त केली. जिल्ह्यत अलिबाग, मुरूड,श्रीवर्धन आदी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातीलअसे स्पष्ट संकेत लॉजिंग आणि हॉटेल्स व्यवसायिकांनी बोलताना दिले. जिल्ह्यतील सर्वच किनारे रमणीय असून आधिक मोठया संख्येने पर्यटक किनारी पर्यटनाकडे खेचले जात असल्याचे दिसून येत आहे. मुरूड-जंजिरा तालुका ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य तालुका म्हणुन प्रसिध्द असून जंजिरा संस्थानची राजधानी होती. बारशिव, काशीद, सर्वे, नांदगांव, मुरूड असे पांच ते सात समुद्र बीच तालुक्यात असून येथील किनार्यावर फिरण्यात एक वेगळीच मौज वाटते.या आठवड्यात गुरुवार पासून पर्यत पर्यटकांची वर्दळ सुरू होईल. मुरूड मध्ये पर्यटकांची लॉजिंग बुकिंग सुरू झाल्याची माहिती हिरा रेसिडेन्सी लॉज चे मालक महेंद्र पाटील, यांनी दिली.
सलग सुट्टी असल्याने चाकरमानी वर्ग कुटुंबातील सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडतील असे संकेत पाटील, यांनी बोलताना दिली.रायगडच्या किनार्यावर वॉटर स्कुटर्स, बनाना राईडर्स, समुद्रातील बोटिंग असे जलक्रीडांची साधने देखील उपलब्ध झाली आहेत.श्री हरिहरेश्वर(दक्षिण काशी), दिवेआगर, जीवना बीचकडे जाण्यासाठी अलिबाग हुन मुरूड तालुका मार्गे आगरदांडा ते दिघी खाडीतून जंगल जेटीने वाहने घेऊन थेट जाण्याची सुविधा रात्री पर्यंत उपलब्ध आहे. याचाच अर्थ अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन हा सागरी किनारा पर्यटन विकासात महत्वाची भूमिका बजविणार आहे.कारण रायगडात धार्मिक, ऐतिहासिक, आणि निसर्गरम्य अशी स्थळे भरपूर आहेत. शिवाय पुढे रत्नागिरीकडे जाण्यासाठी हाच जलमार्ग महत्वाचा ठरणार आहे. सध्या दुपारी तापमान 32 ते 34 सेल्सिअस दरम्यान असले तरी किनार्यावर सायंकाळी 6 नंतर थंडपणा जाणवतोय.







