घोड्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू

| माथेरान | वार्ताहर |
माथेरान मधील घोडेस्वारीचा आनंद पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे. मोहम्मद कासिफ इम्तियाज शेख (वय 23, रा. मुंबई) हे पत्नी व मित्र असे चौघे जण 25 जानेवारीला माथेरानला पर्यटनासाठी आले होते. महात्मा रस्त्यावरून चौघेजण वेगवेगळ्या घोड्यावर निघाले होते. त्यावेळी मोहम्मद कासिफ यांचा घोडा अचानक पळू लागल्याने तोल जाऊन ते खाली पडले होते आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उल्हासनगरातील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीला दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Exit mobile version