| रेवदंडा | महेंद्र खैरे |
मुरूड तालुक्यातील फणसाड धरणामध्ये वर्षा सहल पर्यटनासाठी आलेल्या मुंबई-अंधेरी येथील पर्यटकाचा बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई अंधेरी येथून वर्षा सहल पर्यटनासाठी आलेल्या अकरा जणांचा ग्रुप बोर्ली येथून रविवारी (दि.13) दुपारी अकराच्या सुमारास फणसाड धरणाजवळ पोहचला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फणसाड धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरलेला मुंबई -अंधेरी येथील साहिल राजू रणदिवे (24) बुडून बेपत्ता झाला. याबाबतची तक्रार दिपक नारायण पांचाळ यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे दिली. सायकांळच्या सुमारास पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या साहिल रणदिवेचा मृतदेह सापडला. याबाबत अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दिपक म्हशीलकर हे करत आहेत.







