घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी

चालकाविरोधात गुन्हा दाखल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

चालत्या घोडागाडीच्या धडकेत पर्यटक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि.9) सायंकाळी अलिबाग समुद्र किनारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनल मेढेकर असे या महिला पर्यटकाचे नाव आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी या महिला त्यांच्या कुटुंबियांसमवेत अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. रविवारी सायंकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना चालत्या घोडागाडीची त्यांना धडक लागली. त्यामध्ये पर्यटक महिलेला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी घोडागाडी चालक-मालक वैभव खोत यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनाचालक घोडागाडी नियंत्रणात ठेवली नाही. त्यामुळे घोडे वेगाने पळून पर्यटक महिलेला धडक लागली, असा ठपका वैभव खोत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तेथील घोडे चालक व मालकांनी तातडीने जखमी पर्यटक महिलेला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती घोडे चालक मालकांनी दिली.

Exit mobile version