केळवली धबधब्याची पर्यटकांना पडतेय भुरळ

| खोपोली | वार्ताहर |

खालापूर तालुक्यात असे कित्येक धबधबे असून त्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते, केळवली ग्रामीण गावातील धबधबा हा अशाच सर्वाना भुरळ पाडीत असल्याने गेल्या काही वर्षापासुन या धबधब्यावर पर्यटक सुट्टी व अन्य दिवशी मोठी रिघ लागल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने अल्पवधी काळात हा धबधबा प्रसिद्ध होत आहे.

खोपोली कर्जतचा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या केळवली धबधब्यावर आपल्या वर्षासहलीचा आनंद घेत मज्जा लुटण्यासाठी येत असल्याने केळवली धबधबा अल्पवधी काळात पर्यटकांचा आवडता धबधबा म्हणून ठरत आहेत. डोंगरातून खळखळणारा धबधबा आता पर्यटकावर भुरळ पाडत असल्याने केळवली धबधब्याला पर्यटकांकडून पसंती मिळत असल्याने केळवली धबधब्यावर पर्यटक मंडळीनी आपल्या वर्षा सहलीचा आनंद उपभोगत असून केळवली धबधब्याकडे पर्यटकांचे आपोआप पाऊले वळत असल्यामुळे केळवली धबधब्यावरुन पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. या धबधब्यावर यायचे असल्यास मध्य रेल्वेच्या मुंबई – खोपोली स्थानकामधील केळवली स्थानकावरून चालत 15 मिनिटांमध्ये पोहचता येते, तर वाहने घेऊन येत असल्यास कर्जत – खोपोली मार्गावरील केळवली स्थानकावरून 2 मिनिटांत पोहचता येते.

Exit mobile version