ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद; पर्यटकांचा हिरमोड

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड-राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक येत असतात. यावेळी सलग तीन सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले होते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिघी, खोरा व राजपुरी जेट्टीवर पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु, जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला नसल्याने शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता झाली नसल्याने किल्ला बंद ठेवण्यात आल्याचे परातत्त्व खात्याचे बजरंग येळीकर यांनी सांगितले. तसेच, गेल्या महिनाभर किल्लातील स्वछता सुरु असून, पुढील 4 दिवसांत किल्ला पर्यटकांसाठी खुला करू, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मुरुड-जंजिरा येथील आर्थिक विकास पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात किल्ला बंद ठेवल्याने पर्यटकांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचा देखील हिरमोड झाला आहे.

Exit mobile version