मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची धूम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला जात आहे. घोडागाडीची सफर, बाईक राईड तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद घेत पर्यटकांनी सुट्टीचा पुरेपूर आनंद साजरा केला. याशिवाय अनेक पर्यटकांनी समुद्राच्या लाटांमध्ये पोहण्याचा आणि समुद्रस्नानाचा आनंद देखील घेतला. यावेळी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर रमले होते. पर्यटकांच्या गर्दीमुळे मुरूड समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version