बंदीला झुगारुन दर्याच्या लाटेवर पर्यटक स्वार

काशिद समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी
। मुरूड । वार्ताहर ।
पोलिसांच्या आवाहनानंतरही काशीद बीचवर रविवारी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळ्यामध्ये या बीचवर बंदी घातलेली असते. त्याप्रमाणे याही वर्षी या दिवशी वर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुद्धा त्याठिकाणी असलेल्या पोलिसांना झुगारून पर्यटक समुद्रामधील मौज मस्ती करण्यास जात आहेत.
समुद्रामध्ये पावसाळ्यात मोठ्या लाटा उसळत असतात त्यामुळे समुद्रामध्ये पोहण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. व स्थानिक ग्रामपंचायतीने, या ठिकाणी असलेल्या स्टॉल धारकांनी व ग्रामस्थांनी मिळून काशीद बीच सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मुरुड पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनीही काशीद बीच वर पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन केले आहे.
काशीद बीचवर सूचना देणारे नाम फलक लावण्यात आलेले आहेत व दोरी बांधण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे. तरीही हे पर्यटक सूचनांचे पालन न करताना व पोलिसांना झुगारून बेफिकीरपणे समुद्रात उतरत आहेत. जर एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? असा संवाल ग्रामस्थांमधून होत आहे

Exit mobile version