| उरण । वार्ताहर ।
शनिवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उरणच्या पिरवाडी किनार्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. उरणमधील पिरवाडी किनारा हा पर्यटकांसाठी एक ठिकाण आहे. या किनार्यावर उरणमधील स्थानिक पर्यटकांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगडमधील पर्यटक येत असतात. पर्यटकांसाठी एक दिवसाच्या पिरवाडी व केगाव या दोन किनार्यांना पर्यटक पसंती देतात. त्यामुळे उरणच्या पिरवाडी किनार्यावर मोठ्या संख्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. पिरवाडी परिसरात सध्या घरगुती जेवण, नाश्ता आदींची व्यवस्था तसेच मुलांसाठी करमणुक व खेळण्यांची ही व्यवस्था आहे. तर दुसरीकडे नवीन हॉटेल तयार झाले असून या ठिकाणी वस्तीची ही व्यवस्था आहे. हे हॉटेल्स ही फुल्ल झाली आहेत. त्यामुळे यावर्षी नवं वर्षाच्या स्वागतासाठी पिरवाडी किनार्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.