पर्यटकांची पावले काशिद समुद्राकडे

। कोर्लई । वार्ताहर ।

पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद समुद्रकिनार्‍यावर पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंदी असूनही शनिवार व रविवारी पर्यटकांची पावले वळल्याचे चित्र दिसून आले.

अलिबाग-मुरुड रस्त्यावर असलेला काशिद समुद्रकिनारा पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रस्त्यालगत सुचना फलक देखील लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी सुचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. तरीदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी असूनही पर्यटकांची पावले रविवारी काशिद समुद्राकडे वळल्याचे चित्र दिसून येत होते. येथे सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस, तीन सुरक्षा रक्षक तसेच पार्किंग सदस्य आपली कामगिरी चोख करीत पर्यटकांना मार्गदर्शन करीत होते.

Exit mobile version