। कोर्लई । प्रतिनिधी ।
पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या विकेंडला रविवारी पर्यटक मौजमजा करीत पर्यटनाचा आनंद लुटत असताना दिसून आले.
काशिद-बीच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. पावसाळ्यानंतर शनिवारी मुरुड बीचवर शुकशुकाट दिसून येत होता. मात्र रविवारी सकाळपासून काशिद बीचवर पर्यटक मौजमजा करीत पर्यटनाचा आनंद लुटत असताना दिसून आले.
याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटकदेखील आवर्जून भेट देत असतात. ऑक्टोबरच्या दुसऱ्या विकेंडला रविवारी काशिद बीचवर पर्यटकांनी सांईंड बाईक, घोडा सफर करीत पर्यटनाचा आनंद लुटताना दिसून आले.







