। रेवदंडा । प्रतिनिधी ।
नाताळची सुट्टी तसेच वर्षाअखेरची मौजमज्जा करण्यासाठी समुद्र किनार्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी प्रचंड संख्येने पर्यटक अलिबाग ते मुरूड पट्ट्यामध्ये हजेरी लावत आहेत. परंतु, पर्यटकांच्या वाढत्या वाहनांचा ताण अलिबाग ते रेवदंडा मुख्यः रस्तावर पडला असून या रस्तावर मिनिटागणीत वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे बेहाल झाले आहेत.
सध्या नाताळ, शनिवार, रविवारची सुट्टी तसेच आगामी सरते वर्ष यामुळे अलिबाग व मुरूड तालुक्यांत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे अलिबाग ते मुरूड पट्ट्यातील सर्वच हॉटेल, रिसार्ट हाउसफुल्ल झाली आहेत. याताच अलिबाग ते रेवदंडा मधून निघणारा रस्ता अरूंद व चिचोंळा तसेच वळणाचा आहे. या रस्ताने रेवदंडा, चौल, नागाव व मुरूड तालुक्यातील पर्यटनाकडे ये-जा करणार्या वाहनांची सध्या मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्याला वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी पर्यटकांची वाहने या वाहतुक कोंडीच्या विळख्यात अडकून पडल्याने त्यांचे बेहाल होत आहेत. तसेच, अलिबागहून रेवदंड्याकडे निघालेली पर्यटकांच्या वाहनांना कुरूळ येथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरूस्तीची कामे काढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कुरूळ येथे वाहनांची लांबचलांब रांगा लागल्या होत्या.