कोकण रेल्वेतील ट्रॅकमॅनला मारहाण; अज्ञातावर गुन्हा

। माणगाव । सलीम शेख ।
कोकण रेल्वेतील ट्रॅकमॅनला मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.4) दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान माणगाव तालुक्यातील विंचवली गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर घडली. याबाबत राजकुमार शंकर मोरे (वय-52) रा.नाणोरे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राजकुमार शंकर मोरे हे कोकण रेल्वेमध्ये 33/0 ते 36/6 च्या दरम्यान ट्रॅकमॅन म्हणून माणगाव तालुक्यातील विंचवली गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर चावी मारण्याचे काम करीत होते. त्यावेळी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या पाठीमागून डोक्यात लाकडी दांडका वारंवार मारून त्यांना जखमी केले. याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते हे करीत आहेत.

Exit mobile version