| माणगाव | प्रतिनिधी |
दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत गोड नदीवरील रेल्वे पुलावरील सिमेंट स्टोन कॉलम नं. 104 येथे शुक्रवार, दि.1 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यकांत शिवराम मगर (57) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. आरोपी गणेश रमेश चव्हाण (36) रा. इंदापूर, ता. माणगाव याने त्याची मयत पत्नी शारदा गणेश चव्हाण (35) हिचे दुसऱ्या माणसाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तिच्या हातपाय व छातीवर काठीने मारून तिला गंभीर दुखापत करून नंतर तिचे डोके रेल्वे सिमेंट स्टोन कॉलमवर आपटून तिला गंभीर दुखापत करून तिची हत्या केली. आरोपी पतीला अटक करण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.