200 वर्षांची परंपरा आजही जपली जाते; होळीचा मोठा उत्साह
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
कोळी बांधव कितीही संकटाचा सामना करीत बसला तरी उत्सव प्रिय आहे हे आजच्या अत्याधुनिक मोबाईलच्या जमान्यात देखील दिसून येते. मुरूडमध्ये शुक्रवारी कोळीवाड्यात होळी आणि धुळवड पाहताना कोळी बांधवांची 200 वर्षांपासून सुरू असलेली धुळवडीची पारंपारीक धुळवडीची पंगत मुरूड कोळीवाड्यात सकाळी पाहायला मिळाली.

मुरूड महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले, माजी अध्यक्ष बाळकृष्ण गोंजी, आणि समस्त कोळीसमाज पंचांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य होळीच्या मैदानावरुन ही सामूहिक बांधवांचीही पंगत सन्मान स्वीकारत संपुर्ण कोळीवाड्यातुन सवाद्य निघून सुमारे आठ तासानंतर पुन्हा मुख्य होळी ठिकाणीं विसर्जित होते. अनेक कोळी भगिनी पारंपरिक वेषभूषा करून या पंगत मिरवणुकीत सामील झालेल्या दिसून येत होत्या.अनेक मान्यवर कोळी बांधवांच्या कानाला पारंपरिक सन्मान म्हणून शेवग्याचा फिग लावून प्रत्येक घरी सन्मान करण्यांत आला. 200 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कोळी बांधवांनी पूर्वजांच्या रीतिरिवाजा प्रमाणे सुरू ठेवल्याने नव्या पिढीला एक आदर्शच आहे. होळीचा सण हा पांच दिवस म्हणजे रंगपंचमी पर्यत सुरू राहतो.सर्व जाती धर्माचे लोक यात सहभागी होतात. जीवनात कधी दुःख कधी सुख यांची प्रचिती येतच असते.