ट्रॅफिकचा विद्यार्थ्यांना देखील फटका

| पेण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते खारपाडा दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमााणात बसला. शनिवारी पहिल्या सत्राचे पेपर असल्याने विद्यार्थी पेण ते पनवेल असा प्रवास करीत होते. त्यासाठी सकाळी 8:30 लाच घरातून बाहेर पडले. परंतु वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसला. काही विदयार्थी तर 11:30 च्या आपल्या वेळेवर पोहचू शकले नाही त्यामुळे पेपरसाठी गैर हजेरी लागली. तर काही उशिरा पोहचून जेमतेम पेपर देऊ शकले. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना कृषीवलशी बोलताना व्यक्त केल्या. सकाळच्या सत्रात तीन ते चार तास रस्त्याची काम बंद ठेवावीत जेणे करून पेणकडून मुंबईकडे जाणाऱ्या विदयार्थ्यांना त्रास होणार नाही. आज पेणकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व विदयार्थ्यांचे फस्ट सेमिस्टर सुरू असल्याने वेळेवर पोहोचायचे होते. परंतु काही विद्यार्थी आता ही वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले.

यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, 10 टप्प्यांमध्ये असणारे हे सगळे काम आहे. त्यामधला पहिला टप्पा 42 किमीचे काम तो 10 सप्टेंबरच्या आत अगोदर 100 टक्के पूर्ण होईल. कासूपासून असणारा जो टप्पा आहे तो अत्यंत किचकट असणारा टप्पा आहे. त्याच्यामध्ये आता पांडापूर याभागामध्ये आता आहोत. या भागामध्ये सुध्दा आता सीटीपीचे दोन सेट हे आता जे अधिकचे मागवले पाहिजे होते सुध्दा या भागामध्ये आलेले आहेत. रविवारपासून ते अधिकच्या सीटने पण नव्याने कामाला सुरूवात करायला पाहिजे. नव्याने या 7 किमीचा जो भाग आहे तो अतिशय किचकट आहे आणि या ठिकाणी काम होणे ते अत्यंत गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version