। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गाव असणार्या आंबडवे येथे अभिवादन करण्यासाठी येत असल्याने 12 फेब्रुवारी रोजी मंडणगड तालुक्यातील पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक ता.12 फेब्रुवारी रोजी पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले. महामहिम राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडणगडमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ता. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये पुढील मार्गावरील वाहतूक 9 तास बंद करण्यात येणार आहे.