महामार्गाच्या अंडरपासमुळे वाहतुकत कोंडी

जीव मुठीत घेऊन प्रवास, महामार्ग नियोजनानुसार नसल्याचा अहवाल
पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर शहराचे दर्शन होऊ नये यासाठी अंडरपास जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या वरील बाजूस असलेल्या पूर्वेच्या सर्व्हिसरोडवर शिमग्याच्या पार्श्‍वभुमीवर वाहनांच्या लांबचलांब रांगा उभ्या राहून वाहतुकीची कोंडी होत आहे. यावेळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना अंडरपासच्या खड्डयात पडण्याची शक्यता लक्षात घेत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे तसेच नियोजनानुसार नसल्याचे स्पष्ट मत कोर्टकमिशनने गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणांती केलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे.
पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील 25650 क्षेत्रावरील केवळ 253 बाधित लाभार्थी असताना पोलादपूर शहराची चौपदरीकरणाची परिस्थिती बुडत्याचा पाय खोलात अशी का होत आहे. याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. मुंबईकडून होणार्‍या भूसंपादनात तालुक्यातील पहिले गांव असलेले पार्ले येथील शेतकर्‍यांना लोकवस्ती पश्‍चिमेकडे आणि शेतजमीन पूर्वेकडे असल्याने नियोजित चौपदरीकरणाचा महामार्ग ओलांडून शेती कशी करायची अन् नदीवर पाण्यासाठी गुरे कशी न्यायची, हा प्रश्‍न कॅटलवॉकचे काम फ्लाय ओव्हरच्या भरावातून सुरू करण्यात यश आले. लोहारे या गावांतील बाधितांना मोबदल्याप्रमाणेच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामध्ये होणारा रस्ता पोलादपूर शहरात अंडरपास बॉक्स सिस्टीम म्हणूने उघडया पध्दतीचा भुयारस्वरूप दूतर्फा होत असल्याने चोळई नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग नियोजित ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे बनविण्यात आलेला नसल्याचे कोर्टकमिशनने नेमलेल्या समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले असताना पोलादपूर येथील अंडरपास महामार्गावर पूर्वेकडीत आणि पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडना जोडणारे तब्बल जादाचे पाच पूल उभारण्यात आले आहेत तर पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड मात्र अद्याप वाहतूकीस सुरू झालेला नसल्याने गोव्याकडे आणि मुंबईकडे होणारी वाहतूक फक्त पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरून केली जात आहे. यामुळे या शिमगोत्सवापासून या सर्व्हिसरोडवरून एकेरी वाहतुक होण्याऐवजी दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यामुळे अंडरपासच्या खड्डयात ठिकठिकाणी सर्व्हिसरोड कोसळण्याची परिस्थिती दिसून येत आहे. परिणामी, वाहतुकीची कोंडी होऊन या पूर्वेकडील सर्व्हिसरोड वाहने जीव मुठीत घेऊन चालविली जात आहेत.

Exit mobile version