|श्रीवर्धन | प्रतिनिधी|
अलिबाग-वडखळ मार्गावर रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल दोन ते अडीच तास प्रवासी कोंडीत अडकून पडले. मात्र, या काळात मार्गावर वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. शनिवार-रविवार अलिबाग आणि मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने या मार्गावर वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. त्यामुळे अलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शनिवार-रविवार या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
