बेलघर येथे झाड कोसळून वाहतूक ठप्प

| तळा | प्रतिनिधी |

तालुक्यातील बेलघर येथे मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रविवारी (दि.25) रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर कोसळलेल्या महाकाय वृक्षामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झाली. या मुसळधार पावसामुळे वाहन चालकांना समोरचा रस्ताही व्यवस्थित दिसत नव्हता. या घटनेची माहिती मिळताच चरई खुर्द सरपंच प्रवीण अंबारले यांनी बेलघर ग्रामस्थांच्या सहाय्याने परिश्रम घेऊन सदर महाकाय वृक्ष बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. याप्रसंगी सरपंच प्रवीण अंबारले, सदस्य अजय सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी विजय अंबारले यांसह बेलघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version