पार्किंगसाठी जागा नसल्याने पोलीस प्रशासन हतबल
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर व श्रीवर्धन शहरात तसेच श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली आहे. दिवेआगर किंवा हरिहरेश्वर येथे येणारे पर्यटक आवर्जून श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. मात्र, समुद्रकिनारी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे पोलीस प्रशासनदेखील हतबल झाले आहे. समुद्रकिनारा मार्गावर वाहतुक पोलीस नेमून सुद्धा पर्यटक आपल्या गाड्या जबरदस्तीने समुद्रकिनारी घेऊन जात आहेत.
श्रीवर्धन नगरपरिषद शहराच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांकडून काही कर म्हणून रक्कम जमा करत असते. मात्र, या बदल्यात नगरपरिषद प्रशासनाने पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असताना नगरपरिषद प्रशासनाकडून या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. र.ना. राऊत विद्यालयाच्या पटांगणामध्ये पार्किंगची सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिली होती. मात्र, नगरपरिषदेकडून मैदान साफ केले जात नसल्यामुळे त्या ठिकाणची स्वच्छता केली जात नसल्यामुळे शाळा प्रशासनाने मैदानाच्या बाजूला चर खोदून मैदानात पार्किंगचे प्रवेश बंद करून टाकले आहेत. श्रीवर्धन नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सद्यस्थितीत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांकडे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही ठिकाणचा चार्ज असल्याने मुख्याधिकारी अनेक वेळा फोन रिसीव्ह करत नाहीत.
श्रीवर्धन बाजारपेठेत वाहतूक कोंडी
