। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रोहा मार्गावरील कुरूळ पासून सहाण बायपास दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी (दि.28) सकाळी सहाण ते बेलकडे दरम्यान ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार, विद्यार्थी, पर्यटक आणि स्थानिकांना बसला.
अलिबाग-रोहा मार्गावर वाहतूक कोंडी
