मनसेचा आंदोलनाचा इशारा
| उरण | वार्ताहर |
खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. वाहतूक कोंडीवर त्वरित मार्ग निघावा अशी जनतेतून मागणी होऊ लागली आहे.
मनसेने या जनतेच्या समस्या लक्षात घेउन खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड येथे होणार्या वाहतुक कोंडी संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल धोटे व पोलीस निरीक्षक कळंबोली वाहतुक विभाग बानकर यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले. येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी दिला. यावेळी आरिफ शेख, प्रणव कारखानीस, अतुल चव्हाण, अमोल बोचरे, गणेश बनकर, संजय मुरकुटे, राहुल चव्हाण, भगवान खताळ, सुजित सोनवणे, विवेक बोराडे, सचिन जाधव, प्रकाश लाड, दशरथ मुंडे व कळंबोली शहरातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते.