। नैनिताल । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जोशीमठजवळील हेलांग खोर्यात जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसीचा बोगदा बांधला जात आहे दरीत खाली काही बांधकाम सुरू असताना स्फोट झाला, त्यानंतर डोंगराचा एक भाग तुटून रस्त्यावर पडला, असा दावा केला जात आहे.
या घटनेनंतर चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथला जाणार्या यात्रेकरूंना अडवण्यात आले आहे. महामार्ग बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाहतुक ठप्प झाली आहे. हजारो प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत.