वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांनमधुन संताप
। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई -गोवा महामार्गावरील महाभयंकर खड्डयांतुन प्रवास करणा-या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करत असतांनाच रवि.दि.१८ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वाकण पुलाजवळील रस्त्याच्या मध्येच एका गाडीतील डिझेल संपल्यामुळे तर दुस-या गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या जवळ जवळ २ ते ३ कि.मी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महामार्गावरुन प्रवास करणारे काही वाहनचालक येवढे बेसावधपणे कसे राहु शकतात याचाच प्रत्यय एका ट्रकमधिल भररस्त्यात डिझेल संपल्यामुळे आला आहे. गाडी न. डी.एन. ०९ यु. ९१२६ या गाडीचा चालक वाकण बाजुकड कोलाडच्या दिशेकडे जात असतांना वाकण पुलाच्या पुढे आल्यानंतर अचानक गाडीतील डिझेल संपल्यामुळे बंद पडली. तर तिथेच थोड्या पुढे अंतरावर महाभयंकर खड्डयामध्ये गाडी आदल्यामुळे त्या गाडीचा पाटा तुटल्यामुळे ती गाडी देखील बंद पडली होती. त्यातच रविवारचा दिवस असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु होती. त्यामुळे या दोन्ही गाड्या रस्त्याच्या मध्येच बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळ जवळ ३ ते ४ तास या प्रवाशांना वाहतुक कोंडीमध्ये ताटकळत रहावे लागल्यामुळे प्रवाशीवर्गांतुन तीव्र संताप व्यक्त होत होता.
दरम्यान या घटनेची खबर मिळताच महामार्ग पोलिस केंद्र वाकण चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव मोकल, पो.ना.विशाल रोते, पो.ना.अथर्व पाटील, प्रियेश साळावकर, जयेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन काही वाहतुक हि वाकण -आमडोशी – रोहा मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे जवळपास ३ ते ४ तासांनंतर वाहतूक सुरळीतरित्या चालू झाली.






