दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्याला जाणारा मार्ग बंद
। पनवेल । वार्ताहर ।
आज (दि.28) मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्याला जाणारा मार्ग चिखले येथे रेल्वे गार्ड टाकण्याकरता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, कळंबोली येथे सायन-पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. यावेळी कळंबोली वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ही वातूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.