| खोपोली | वार्ताहर |
सलग सुट्ट्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. सातारा बाजूकडून जाणारा खंबाटकी घाट शनिवारी सकाळी आठपासून जाम झाला आहे. मुंबई-पुणे, सांगली-इस्लामपूर, कोल्हापूर-बेळगांव, सातारा-कराड रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झालीये. कराडजवळ सहापदरीकरणाचं काम सुरू झालं असून या कामामुळं कोल्हापूर, पुणे, सांगलीकडं होणारी वाहतूक विलंबानं सुरु आहे. त्यातच आता शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार (1 मे कामगार दिन) अशी सलग सुट्टी असल्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत.