दोन तासांऐवजी तीन तासांचा प्रवास
| मुरुड | प्रतिनिधी |
दिवाळी सुट्टी आणि रविवार त्याच दिवशी भाऊबीज या तृतीय योगामुळे मुरुड-अलिबाग रस्त्यावर चक्का जाम झालेला पहावयास मिळाला. या प्रवासादरम्यान मुरुड ते अलिबाग एसटी बसला जास्तीत जास्त दोन ते पावणे दोन तास लागतात. तरी या दिवाळी भाऊबीज सणामुळे या रस्त्यावर पावणे दोन तासांऐवजी तीन तासांचा प्रवास करावा लागला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पावसाळी हंगामानंतर दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात शाळांना सुट्टी पडली असते. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण फिरायला येत असतात. मुरुड तालुक्यातील जगप्रसिद्ध काशीद बीचवर मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात, तसेच मुरुड जंजिरा किल्ला पाहावयास मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यास सुरुवात होत असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी होत असते. यावेळी रविवारी सुट्टीच्या दिवशी भाऊबीज आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
भाऊबीजेच्या निमित्ताने बाहेरगावी दिलेल्या आपल्या बहिणींकडे जाण्यासाठी भावांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होत असतो. या दिवशी इतकी प्रचंड गर्दी असते की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. एसटी बसने प्रवास करताना मोठ्या प्रमाणात गर्दी पास मिळतो. यावेळी या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने मुरुड अलिबाग रस्त्यावर बसमधून काढलेले छायाचित्र रस्त्यावर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी दर्शवत आहे.