वडखळ ते अलिबाग महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

20 मिनिटांच्या प्रवासाला दोन तास
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वडखळ ते अलिबाग महामार्गावर रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांची भली मोठी रांग लागली होती. या मार्गावरील अवघ्या 20 मिनिटांच्या प्रवासाला तब्बल दोन दोन तास खोळंबल्याने त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी अलिबाग, मुरुड कडे केली होती. दुपारनंतर परतीच्या मार्गाला लागलेल्या पर्यटकांनी अलिबाग ते वडखळ रस्ता गजबजला होता. मांडवा ते गेट वे जलवाहतूक देखील बंद झाल्याने अलिबाग पेण मार्गावर प्रचंड वाहतुकीचा ताण पडला. त्यामुळे या मार्गावर 4/5 किलोमिटर पर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वडखळ ते अलिबाग या मार्गावर 20 ते 30 मिनिटांचा प्रवासाला वेळ लागतो. मात्र आज या मार्गावरून प्रवास करण्यासाठी तब्बल दोन दोन तास वेळ लागत होता. रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खोळंबल्याने वाहन चालक तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यात लग्न आदी इतर समारंभाला जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत होता.

Exit mobile version