सूचना! मुंबई-गोवा महामार्ग बंद;कोकणात पुरसदृश्य स्थिती

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकणात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जगबुडी, काजळी, शास्त्री, कोदवली, बावनदी आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावरुन प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुसळधार पावसामुळे कोकण व सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट दरड कोसळल्याने अद्याप ठप्प आहे. लांजाजवळ असलेल्या काजळी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गवरील अंजनारी पुलावरून दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

लाटवण रेवतळे पुलावर पाणी आल्याने दापोली मंडणगड लाटवण महाड रस्ता बंद झाला आहे. खेड नगरपरिषदेकडुम शहरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खेड-दापोली मार्गाजवळ पाणी असून हा मार्गही ठप्प होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version