वाहन चालकांकडून तीव्र संताप
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
पाली बाजारपेठेत कोणतेही पार्किंग व्यवस्था नसल्याने दुकानदाराच्या समोर असंख्य दुचाकी गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या ठिकाणी कोणताही नो पार्किंग बोर्ड नसतांना या गाडयांचे वाहतूक पोलिस फोटो काढून वाहन धारकांकडून दंड वसुली करीत आहे. या नाहक त्रासाबद्दल वाहन धारकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पालीच्या आजूबाजूच्या परिसराततील आदिवासी, महविद्यालयीन विद्यार्थी, दूध विक्रेते व शेतकरी बांधव कामानिमित्त पालिबाजारपेठेत येत असतात. त्यांना गाड्या लावण्यासाठी संबंधितांकडून कोणतेही पार्किंग व्यवस्था केली नसताना गाड्या लावणार कोठे असा प्रश्न प्रश्न दुचाकीधारकांकडून केला जात आहे.
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष उमेश मढवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाली बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याचे काम सुरु असून रस्त्यात खड्डी पसरून ठेवली आहे. ज्या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या जात आहेत तेथे कोणताही पार्किंग बोर्ड नाही मग कोणत्या नियमानुसार वाहतूक पोलिस टूव्हीलर गाडयांचे फोटो काढून दंड वसुल करीत आहेत. असे त्यांनी निदर्शनास आणले. महागाईने जनता पूर्णपणे होरपळून निघत असून कोरोना पासून लोकांना दोनशे रुपये कमवणे कठीण झाले आहे. या बाजारपेठेत छोटे व्यापारी टूव्हीलर वर माल घेऊन येत असतात ते गाड्या दुकानासमोर लावतील नाहीतर गाड्या डोकयावर घेऊन दुकानात जातील काय? त्यामुळे लोकांकडून पैसे उकलण्याचे थांबवा नाही तर तीव्र आंदोलन करू, असा संतप्त इशारा मढवी यांनी दिला आहे.