| अलिबाग | प्रतिनिधी |
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना रायगड पोलिसांनी दणका दिला आहे. गुरुवारी (दि.6) दिवसभरात केलेल्या कारवाईत 56 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा वाहतूक शाखेमार्फत बेशिस्त वाहन चालकांवर नेहमी कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गासह जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 55 वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.







