| चिरनेर | प्रतिनिधी |
सततच्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि.6) रात्री उरण तालुक्यातील चिरनेर अक्कादेवी आदिवासींच्या वाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळण्याची घटना घडली होती. दरड रस्त्यावर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरूम, माती, दगड रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीबरोबर या भागातील शेतकरी व आदिवासींची वाट बंद झाली होती. दरड कोसळल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच, प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचून जेबीसीच्या साहाय्याने रस्त्यावरील मुरूम, माती व डोंगराचा मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू केले. मातीचा हा ढिगारा पूर्णपणे काढून रस्ता सुरक्षित केल्यानंतरच या मार्गावर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
कोसळलेली दरड हटवून वाहतूक केली सुरळीत
