कार्लेखिंड अपघातामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड येथे वळणावर मालवाहू ट्रक सकाळी पलटी झाला. ट्रकमधून तेल रस्त्यावर सांडल्याने अपघात होण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा वाहतूक शाखा व अलिबाग पोलीसांच्या मदतीने प्रवासी, चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कनकेश्‍वरफाटा मार्गे, गोंधळपाडा येथून वाहतूक वळविण्यात आली आहे.  अलिबाग-पेण मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवशांनी या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version