| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 17 जानेवारी रोजी वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 409 वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण 4 लाख 21 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालविणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.






