गजानन उभारे यांचे दुःखद निधन.

। उरण । वार्ताहर ।
बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन रामजी उभारे (वय 73) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने संपूर्ण उभारे कुटुंबियांवर व बोरी ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. ते महाराष्ट्र बँकेत नोकरीला होते. ते 13 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात 2 मुले, 1 सून, 1 नात, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवारी (दि. 11) उरण मधील माणकेश्‍वर येथे होणार आहे. तर तेरावे शनिवारी (दि.14) त्यांच्या राहत्या घरी आहे.

Exit mobile version