ट्रेलरची रिक्षाला धडक; अपघातात एक ठार दोन जखमी 

| उरण | वार्ताहर |

न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करळ वाहतूक शाखेच्या हद्दीतील आय एम सी कंपनी जवळील रस्त्यावर आज सकाळी मालवाहू ट्रेलर ने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघात रिक्षामधील भरत ठाकूर या प्रवासी कामगाराचा जागीच मृत्यू झालाची घटना घडली आहे. रिक्षामधील रिक्षा चालक सचिन म्हात्रे आणि कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, या घटनेचा अधिक तपास न्हावा शेवा पोलीस करीत आहेत.

Exit mobile version