ट्रेलरची स्कुटीला धडक; महिलेचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव ट्रेलर चालकाने एका स्कुटीस धडक दिलेल्या अपघातात एक महिला जबर जखमी होऊन मृत्य झाल्याची घटना पनवेल जवळील गव्हाणफाटा येथील फुलकर्म शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा.ली. कंपनीच्या समोर घडली आहे. गव्हाण फाटा येथून स्कुटी वरून जात असणाऱ्या सबा खान यांच्या गाडीस भरधाव ट्रेलर ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या गंभीर रित्या जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version