। पनवेल । प्रतिनिधी ।
ट्रेलरवरील ताबा सुटल्याने ट्रेलर वडाच्या झाडाला धडकला आणि ट्रेलरवरील चालक पाटेश्वर रामबेलास याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ट्रेलर क्रमांक एमएच 46 बीबी 1921 वरील चालक पाटेश्वर रामबेलास (38, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने घेऊन जात होता. कोन, रसायनी सिमेंट रोड देवळोली गावच्या 100 मीटर अगोदर त्याचा ट्रेलरवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला ठोकर मारून अपघात झाला. या अपघातात ट्रेलर पलटी झाला आणि चालक पाटेश्वर रामबेलास हे गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.