| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई महामार्गावर ट्रेलर व बसमध्ये धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले आहेत.

मुंबई महामार्गावर बंद पडलेल्या ट्रेलरला स्लीपर कोच बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर तर ७ किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना ॲम्बुलन्समधून एमजीएम हाॅस्पीटल पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे.