| पेण | प्रतिनिधी |
आई डे केअर संस्था संचालित बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यावसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र, रामवाडी पेण-रायगड येथे गुरुवार (दि.18) रोजी विद्यार्थांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुगम्य भारत अभियान या योजनेअंतर्गत जागतिक प्रवेश योग्यता जागृरुकता दिवसानिमित्त राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था नवी मुंबईचे प्रा. घानेश्वर सावंत यांनी मार्गदर्शन केले. आई डे केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील यांनी विविध ऍक्टिव्हिटी व्दारे पालकांना आणि शिक्षकांना आपल्या मुलांना येणार्या अडचणी आणि अडथळे याबाबात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांनी केली.