कृषीदिनी आदिवासींसाठी शेती उपक्रमांचे प्रशिक्षण

। नेरळ । वार्ताहर ।
कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आदिम जमातीसाठी कृषीविषयक विकास आणि संवर्धन यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग, कृषी विभाग आणि भात संशोधन केंद्र यांच्या मध्यातून कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, भात आणि नागली पिकांच्या लागवडीसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराला मोठ्या प्रमाणात आदिम जमातीमधील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच मूल्यवर्धन या विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. ताटे, तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक सी.जी. खोडके, भात संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधक रवींद्र मर्दाने, संशोधन संचालक एस.बी. भगत, संशोधक डॉ. बी.डी. वाघमोडे, डॉ. श्री. म्हसकर, डॉ. श्रीम. सावंत, डॉ. तुषार बेंडसे, डॉ. शशिकांत थोरात ,त्यांच्यासह तालुका पशुधन विकास अधिकारी मिलिंद जाधव, महाबीजचे सचिन पाटील आदींनी भात आणि नागली पिकाच्या विविध लागवड पद्धती तसेच , भात आणि नागली पिकाचे विविध वाण आणि भात-नागली पिकावर येणारे कीड रोग याबद्दल मार्गदर्शन केले.

Exit mobile version