निवडणूक कर्मचार्‍यांना माणगाव येथे प्रशिक्षण


| म्हसळा | वार्ताहर |

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत येत्या (दि.7) मे रोजी होणार्‍या मतदाननिमित्त 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या मतदार केंद्रास्तरीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण मंगळवार (दि.29) माणगाव येथील ज. गांधी मेमोरियल हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅट हाताळणे बाबत प्रशिक्षण अशोक दादा साबळे विद्यालयामध्ये संपन्न झाले. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरास श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर, म्हसळा तहसीलदार समीर घारे, तळा तहसीलदार स्वाती, म्हसळा निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version