| अलिबाग | प्रतिनिधी |
सीआयएसएफ दलामार्फत 380 अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला देशभरातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 150 शहरांमधील 380 अग्निशमन कर्मचाऱ्यांना यशस्वीरीत्या प्रशिक्षण दिले.
हैदराबाद येथे झालेल्या सीआयएसएफ कवायत दरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतातील शंभर शहरांमधील अग्नीशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविली. त्यांच्या सुचनेनुसार, राज्य अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याशिवाय, चालू आर्थिक वर्षात सीआयएसएफने आपल्या सर्व युनिट्स आणि फॉर्मेशनमधील जवानांच्या दैनंदिन आहारात 30 टक्के श्रीअन्न (मिलेट्स) वापराचा मानांक पार केला आहे. या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून श्री अन्न सारथी पुस्तकाचे प्रकाशन जीसीआयएसएफच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध केले आहे. तसेच, देशभरात विविध ठिकाणी मिलेट मेळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.







