| रायगड | प्रतिनिधी |
वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपघाती स्थळांवर होणारे अपघात रोखणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. अपघात झाल्यावर सर्वप्रथम पोहोचणारे हे वाहतूक पोलिस कर्मचारी असतात. यासाठी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा होणार आहे. मणिपाल रुग्णालयाचे संचालक परमेश्वर दास यांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांबरोबर सहकार्य करुन आम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांना कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यावर भर देत आहोत.






