आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण

| अलिबाग | वार्ताहर |
आतापासून योग्य गुंतवणूक केली तर आपला भविष्यकाळ चांगला जाईल, असे जाते. परंतु ती गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, यासाठी अलिबाग येथे आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण गुरुवार, 26 जानेवारी रोजी सायं. सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. आर्थिक नियोजनकार समीर मीलन दिघे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वेव्हज् हॉटेल, अ‍ॅक्सिस बँकेसमोर, कर्वे रोड, अलिबाग येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यावेळी गुंतवणूक आणि कशी करावी, शेअर बाजारातील गुंतवणूक किती फायदेशीर आणि किती जोखमीची? शेअरबाजाराची सद्यःस्थिती समजून घेणे, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?, एमआयपी, एसडब्ल्यूपी, एसटीपी नियोजनात कसे वापरले जावे, सब्जेक्ट टू मार्केट रिक्स याचा अर्थ काय?, जागतिक मंदीच्या वातावरणात भारताची आर्थिक स्थिती नक्की कशी आहे? मंदी भारतात येणार येणार? आगामी बजेट घेऊन गुंतवणूक धोरण कसे आखायला हवे, याबाबत आर्थिक नियोजनकार समीर दिघे मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी 8149662629 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

Exit mobile version