‘युनायटेड वे’ तर्फे शेतकर्‍यांना प्रशिक्षण

शेतकर्‍यांना रोजगारनिर्मितीसाठी उपक्रमांची माहिती

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील शास्वत शेतीसाठी प्रयत्न करणारे युनायटेड वे स्वयंसेवी संस्थेकडून शास्वत शेतीसाठी मार्गदर्शन केले जाते. तालुक्यातील 17 गावांमध्ये समग्र ग्रामविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा जल संजीवनी प्रकल्प कर्जत तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव, कुरुंग ग्राम पंचायतीतील 17 गावात तसेच समग्र ग्रामविकास कार्यक्रम पाथरज आणि वारे ग्रामपंचायतीमधील एकूण 11 गावात युनायटेड वे मुंबई संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास करणे असून त्यात पिण्यासाठी पाणी उपलब्धता करून त्याचा इष्टतम वापर करणे (बंधारे, सूक्ष्म सिंचन वापर इ.), शाश्‍वत शेती अंतर्गत हवामान बदलामुळे शेतीवर होणार्‍या दुष्परिणामांना कमी करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून राहणीमान उंचावणे, रोजगारनिर्मिती करणे, गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करणे इ. आहे. कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी अनिल कदम यांनी विशेष नियोजन केले होते.

युनायटेड वे या संस्थेने मशरूम- उत्पादन, प्रक्रिया ते मार्केटिंगफ ह्या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण खांडस ग्रामपंचायतीमधील पेटारवाडी येथे आले. सदर प्रशिक्षणासाठी जी.बी.एस. मशरूम आणि अ‍ॅग्रो बिजनेस प्रायवेट लिमिटेड, चंद्रपूर या कंपनीचे तज्ज्ञ प्रफुल्ल शेंडे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात एकूण 42 जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ज्यात 29 महिला व 13 पुरुष यांचा समावेश आहे.

Exit mobile version