नवी मुंबईतील फार्मसिस्टना प्रशिक्षण

। नवी मुंबई । वार्ताहर ।
नुकताच जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा झाला व त्या निमित्ताने सानपाडा येथील केमिस्ट भवनात नवी मुंबई रिटेल केमिस्ट व होलसेलर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या व भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ फार्मासी यांच्या सहकार्याने नवी मुंबईतील फार्मासिस्टचा गौरव केला असून त्याना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.

आजारी पडल्यावर आपण नेहमीच फार्मासिस्टची मदत घेऊन प्राथमिक उपचार करतो. रुग्णांना समुपदेशन करणे तसेच त्याना औषधांची योग्य माहिती देण्यासोबतच आता ते हृदयविकार झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवू शकतील असा विश्‍वास तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे व्यक्त करण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक फार्मसिस्ट तसेच फार्मसीचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेरणा हॉस्पिटलतर्फे अतिदक्षता विभागातील डॉ विपुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रबरी मानवी पुतळ्याच्या मदतीने उपस्थित फार्मासिस्टना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.

Exit mobile version