गद्दारांना शिवसेनेत थारा नाही – उद्धव ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।
बंडखोरांच्या मुद्यावरून शिवसेना आता आक्रमक झाली असून याबाबत निवडणूक आयोगाकडे रितसर जाणार असल्याचे पक्षाने जाही केलेले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना पक्षात परत घेणार नाही असे सांगत त्यांनीही बाळासाहेब ठाकरंचे नाव वापरू नये असा इशारा दिला. याच बैठकीत गद्दारांना परत घेऊ नका अशी मागणी करण्यात आली. तसा ठरावही यावेळी करण्यात आला. बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

Exit mobile version